पुणे महापालिकेचे हजार कोटी वाचले !

मुंबई – पुणे शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पाची निविदा काढताना गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. हा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरच उलटवला. महापालिकेत आमची सत्ता येण्यापूर्वी आधीच्या स्थायी स्थायी समितीने याला मंजुरी दिली होती. आमची सत्ता आल्यावर आधीच्या निर्णयाला स्थगिती देऊन नव्याने निविदा काढली व प्रकल्पाचा खर्च 25 टक्क्‌यांनी कमी झाला.

यामुळे महापालिकेचे एक हजार कोटी रुपये वाचल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तुरीच्या भरडाईत घोटाळा झाल्याचा आरोप फेटाळून लावताना, आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीत गैरप्रकार झाले असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)