पुणे महापालिका : चर्चेच्या खात्यात बदल

पुणे – महापालिकेच्या सर्वाधिक चर्चेचे विभाग भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार, बदल करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक महत्त्वाचा विभाग तांत्रिक छाननी समिती आहे. या समितीमधून सर्व विकासकामांच्या निविदा मंजूर होतात, गेल्या काही दिवसांत चुकीच्या पध्दतीने आलेले अनेक विषय समितीने अडविण्यात येत आहेत. त्यामुळे भाजप नगरसेवक नाराज आहेत.

या शिवाय, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागही काढण्यात आला आहे. तसेच परिमंडळ 2, 3 व 5 चे कामही काढून घेण्यात आले आहे. विशेषत: या सर्व विभागांमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात प्रामुख्याने कोथरूड, औंध, घोले रस्ता, टिळक रस्ता, कसबा विश्रामबाग, बिबवेवाडी तसेच भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचा समावेश असून या ठिकाणच्या प्रभाग समित्याही भाजपच्या हातात आहेत. त्यामुळे या खाते पालटामुळे पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)