पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; के.पी.11 संघाने पटकावला महापौर चषक

पुणे – पुणे महानगर पालिका आयोजीत पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतीम सामन्यात के.पी. 11 संघाने स्निगमय फुटबॉल क्‍लबवर 2-1 असा विजय मिळवत महपौर चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेपत आपल्या नावे केले. तर उत्कर्ष क्रीडा मंडळने रियल पुणे युनायटेडला सडन डेथ मध्ये हरवत स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.

ढोबरवाडी येथील मैदानावर होत असलेल्या महपौर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतीम सामन्यातील खेळात के.पी.11 संघाने स्निगमय फुटबॉल क्‍लबचा पराभव करत महपौर चषक पटकावला. सामन्यात स्निगमयच्या हेमराज हूडाने 24व्या मिनिटाला पहिला गोल करत स्निगमयला आघाडी मिळवून देत धडाकेबाज सुरुवात केली. त्या नंतर मात्र के.पी.11च्या बचावफळीने स्निगमयच्या खेळाडूंना जस्तवेळ चेंडू मिळुच दिला नाही त्यामुळे स्निगमयला सामन्यात पुन्हा गोलच नोंदवता आला नाही.

तर सामन्यात 1-0 ने पिछाडीवर असलेल्या के.पी.11 च्या विश्‍वनाथ शेळकेने सामन्याच्या 43व्या मिनिटाला गोल करत के.पी.ला 1-1 अशे बरोबरीत आणले. या नंतर के.पी.11 च्या खेळाडूंनी आपले आक्रमण चालुच ठेवत सामन्याच्या 57व्या मिनिटाला दुसरा गोल करत 2-1 अशी आघाडी करत सामना जिंकला.

तत्पुर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी उत्कर्ष क्रीडा मंडळने रियल पुणे युनायटेड यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंडळने रियल पुणे युनायटेडला सडन डेथ मध्ये मात करत सामना आपल्या नावे केला. सामन्यात ठराविक वेळेत दोन्ही संघ केवळ 1-1 च गोल नोंदवू शकल्याने सामना टाय ब्रेकर मध्ये खेळवला गेला. टाय ब्रेकरमध्ये दोन्ही संघांनी 4-4 गोल नोंदवले. त्या नंतर सडन डेथ मध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात उत्कर्ष क्रीडा मंडळने 3 गोल नोंदवले तर रियल पुणे युनायटेडने 2 गोल नोंदवल्याने उत्कर्ष क्रीडा मंडळने हा सामना 8-7 असा आपल्या नावे करत स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)