पुणे मनपा : स्थायी समितीत भाजप, कॉग्रेस, सेनेला झटका

हे सदस्य पडले बाहेर…


मुरलीधर मोहोळ ( भाजप, स्थायी समिती अध्यक्ष)
नाना भानगिरे ( शिवसेना )
हरिदास चरवड ( भाजप)
योगेश समेळ ( भाजप)

रेखा टिंगरे ( राष्ट्रवादी)
बॉबी टिंगरे ( भाजप)
प्रिया गदादे ( राष्ट्रवादी)
अविनाश बागवे ( काँग्रेस)

स्थायी समिती अध्यक्षही बाहेर…

पुणे: महापालिका निवडणुकीनंतर स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असल्याने समिती मधील आठ सदस्य आज चिट्ठी द्वारे बाहेर पडले. त्यात भाजपचे सर्वाधिक 4 सदस्य बाहेर पडले असून त्यात स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.समिती सदस्य पदाचा कार्यकाळ 2 वर्षांचा असल्याने निवडणुकी नंतर समितीचा पहिले वर्ष पूर्ण होताच 8 सदस्य बाहेर पडतात. आज काढण्यात आलेल्या चिठ्या मध्ये भाजपचे 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे  2सदस्य शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक  या चिठ्या मध्ये बाहेर पडला .सभागृहात उपस्थित अधिकारी तसेच नगरसेवकाच्या हस्ते काढण्यात आल्या.

स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी अर्धे म्हणजेच आठ सदस्यांचा कार्यकाळ दरवर्षी संपुष्टात येतो. चिठ्ठीद्वारे ही नावे काढली जातात. ज्या पक्षांच्या सदस्यांची नावे येतात तेथे त्याच पक्षातील अन्य सदस्यांची निवड केली जाते. सध्या पक्षीय बलाबल प्रमाणे स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य यांचा समावेश आहे. फेब्रुवारीतील मुख्यसभेत ही आठ नावे समितीला मुख्यसभेकडे सादर करावी लागणार आहेत. त्याआधी चिठ्ठी काढणे आणि पक्षाद्वारे नव्या सदस्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 

भाजप : 4
राष्ट्रवादी : 2
काँग्रेस : 1
शिवसेना : 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)