पुणे मनपासोबत रावेतकर ग्रूप यंदाही राबविणार ‘गणेश विसर्जन बूथ’ उपक्रम

पुणे – यंदाचं वर्ष हे गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासारखंच, दरवर्षी बाप्पाला घरी आणताना अबालवृद्धांमध्ये प्रचंड उत्साह असतो. दीड, पाच, सात, अकरा दिवस घराघरांमध्ये बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. बाप्पाचं पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येकाची सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. बाप्पाला निरोप द्यायच्या वेळेस मात्र हे पावित्र्य हरवण्याची भीती असते. त्याचं कारण म्हणजे विसर्जन घाटावरील अस्वच्छता, पावसामुळे झालेला चिखल. अशा वातावरणामध्ये गणेशमूर्ती जमिनीवर ठेवून आरती करण्याची भक्तांवर वेळ येते. ही समस्या लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेनं एक अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे, तो म्हणजे गणेश विसर्जन बूथ. सेतू ऍडव्हर्टायझिंगच्या कल्पनेतून साकारलेल्या या बूथ्सना मागच्या वर्षी भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. मागील वर्षीप्रमाणेच रावेतकर ग्रूपनं या उपक्रमास प्रायोजक्तत्व दिलं आहे.

याविषयी अधिक बोलताना रावेतकर ग्रूपचे अमोल रावेतकर म्हणाले, की पुणे आज स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते. बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेस येणारी अडचण सोडवणारे हे बूथ्सही असेच स्मार्ट आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदादेखील आम्ही हे बूथ भाविकांसाठी घेऊन आलो आहोत. पुण्यात जे चांगलं ते जोपासण्यासाठी रावेतकर ग्रूप नेहमीच तत्पर असतो.

कुठे असणार गणेश विसर्जन बूथ?

गरवारे कॉलेज पुल
अलका चौक
गांधीभवन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)