पुणे – भूमिगत वीजवाहिन्यांसाठी अखेर हिरवा कंदील

खोदाई शुल्कात पालिकेसोबत तडजोड : महावितरणचा निर्णय

पुणे – महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी प्रशासनाने अखेर हिरवा कंदिल दाखविला आहे. महावितरण आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये खोदाई शुल्कामध्ये तडजोड झाल्यानंतर शहराच्या मध्यवस्तीसह अन्य भागात हे काम करण्यास महावितरणने अनुकूलता दर्शवली आहे. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून हे काम सुरू होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहर आणि उपनगरातील नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, हे नागरीकरण वाढताना वीज ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. नव्याने वीजजोड घेताना ते खांबावरुन घ्यावे लागत आहेत, परिणामी विजेच्या अपघातांतही वाढ झाली. विशेषत: पावसाळ्यात हे अपघात होण्याची शक्‍यता दाट असते. त्यामुळे अनेक निरपराध नागरिकांना त्यांचे जीव गमवावे लागले होते. त्यावर भूमिगत वीजवाहिन्यांचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यासाठी इन्फ्राच्या माध्यमातून मोठा निधीही देण्यात आला. या माध्यमातून आतापर्यंत शहराच्या पंधरा ते वीस टक्के भागात अशा प्रकारे भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.

मात्र, महापालिका प्रशासनाने अचानकपणे खोदाई शुल्कात वाढ केल्याने हे काम थांबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला होता. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून हे काम ठप्प झाले होते, परिणामी, या कामासाठी आलेला निधी परत पाठविण्याची नामुष्की महावितरणवर ओढवली होती. त्याच कालावधीत विजेच्या अपघातामुळे अनेक निरपराधांना जीव गमवावा लागला होता, त्याची गंभीर दखल घेऊन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका प्रशासनाशी चर्चा केली होती. बावनकुळे यांच्या शिष्टाईमुळे हे शुल्क कमी करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दर्शवली होती. त्यानुसार हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)