पुणे : भाजपची पुन्हा गोची!

कायद्यातील तरतुदींनी मुख्यसभेत झाली अडचण

पुणे- महापालिका कर्मचारी वसाहत पुनर्विकासाच्या प्रस्तावावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपची शुक्रवारी बहुमत असूनही कोंडी झाली. या विषयावर विरोधकांनी दिलेल्या उपसूचना फेटाळल्यावर विरोधकांनी लेखी मतदानाची मागणी केली. त्यामुळे तब्बल तासभर सभा थांबवून हा विषय मतदान घेतल्यानंतर मंजूर करण्यात आला. मात्र, अचानक लेखी मतदानाची मागणी झाल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच पंचायत झाली.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या घोरपडे पेठ कॉलनी क्रमांक 8 व 9, शुक्रवार पेठ, बुरुड चाळ वसाहत, आणि पांडवनगर वसाहत बीओटी तत्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. मात्र, त्यासाठीची निविदा-2011 मधील असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस सदस्यांनी त्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. तसेच या योजनेचा वाढीव एफएसआय महापालिकेला मिळावा अशी उपसूचना दिली. मात्र, सत्ताधारी भाजप कडून ती स्वीकारण्यास नकार देण्यात आला. तर कॉंग्रेस हा विषय महत्वाचा असल्याने तो मंजूर करावा, अशी मागणी केली.

तर भाजप हा प्रस्ताव मंजूर करण्यास तयार होती. त्यामुळे हा उपसूचनांचा वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी चार सदस्यांच्या स्वाक्षरी घेऊन या प्रस्तावावर लेखी मतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहाची चांगलीच अडचण झाली. तर या मागणीमुळे उपसूचनांसह नगरसचिवांना लेखी मतदान घ्यावे लागले. हा गोंधळ तब्बल एक तास सुरू होता. अखेर नगर सचिवांना हे मतदान घ्यावे लागले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मतदानावर बहिष्कार
राष्ट्रवादीने ही मतदानाची केली होती. मात्र, जेव्हा मतदान सुरू झाले तेव्हा ते चुकीच्या पद्धतीने होत असल्याने या मतदानावर बहिष्कार घातला. कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी न करता सत्ताधारी आणि प्रशासन चुकीच्या पद्धतीने कामकाज करत असल्याचे सांगत राष्ट्रवादीने या मतदानात सहभाग घेतला नाही. तसेच कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेनेही मतदान केले नाही. अखेर 66 विरोधात 3 मतांनी हा ठराव मंजूर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)