पुणे: भाई वैद्य यांना मुख्यसभेत श्रद्धांजली

सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्‍त केल्या शोकसंवेदना

पुणे – “ज्येष्ठ सामाजिक नेते दिवंगत भाई वैद्य यांनी अखेरपर्यंत समाजातील तळागाळातल्या उपेक्षित वर्गाची दुःखे कळकळीने मांडली. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला आहे’, अशा भावना सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी महापालिका मुख्यसभेत व्यक्त केल्या.

-Ads-

पुण्याचे माजी महापौर, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना पालिकेच्या मुख्य सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. यावेळी महापौर, सभागृह नेते, विरोधीपक्ष नेते यांच्यासह वैशाली मराठे, गफूर पठाण, दीपक मानकर, दत्ता धनकवडे, गोपाळ चिंतल, अजित दरेकर, सुनीता वाडेकर, सुभाष जगताप, अजय खेडेकर यांनीही भाईंना शब्दरूप श्रद्धांजली वाहिली.

गृहराज्यमंत्रीपदी असताना भाई वैद्य यांनी नागरिकांसोबत पोलिसांचाही सदैव विचार केला. अखेरपर्यंत प्रेरणादायी काम करणाऱ्या या सक्षम नेत्यास सर्वजण मुकलो आहोत’
– मुक्ता टिळक, महापौर.

“सेवा दलाचे निष्ठेने काम करताना भाई वैद्य यांनी कायम जातीयवादावर कठोर प्रहार केले. वयाच्या नव्वदीतही त्यांचा व्यासंग मोठा होता. पुण्याच्या जडणघडणीत सहभाग असणारा आणि विचारांशी सदैव निष्ठा राखणारा समाजवादी चळवळीतील आधारवड आपण हरपला आहे.
– चेतन तुपे, विरोधी पक्षनेते, मनपा.

सत्तेच्या राजकारणातही समाजवादाप्रति भाई वैद्य यांनी सदैव निष्ठा राखली. त्यांचे विचार प्रेरणादायी होते. त्यातून आपल्याला सदैव प्रेरणा मिळेल.
अरविंद शिंदे, गटनेते, कॉंग्रेस.

अतिशय परखड, स्पष्टवक्ते आणि अखेरपर्यंत संघर्षरत असलेल्या भाईंनी आपली विचारधारा प्रामाणिकपणे जपली. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.
श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)