पुणे – भांडण सोडविण्यास गेलेल्या व्यक्तीस लोखंडी पाईप आणि बांबूने मारहाण केल्याप्रकरणी युवकास पोलिसांनी अटक केली आहे. तर, तिघे फरार आहेत. न्यायालयाने अटक केलेल्या गणेश अभिमान शिंदे (वय 23, रा. नादेडगाव, भुराज मांडला जवळ, ता. हवेली) याला 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मनोज तुकाराम खळदकर (वय 27, नादेड, जय भारत तालीम जवळ, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक विकास लोणारे (वय 25, रा. शिवणे, एनडीए रोड, ता. हवेली), संदीप गोरे आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना नादेड मराठी शाळेजवळ 12 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. कामगारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना जाब विचारला असता, त्यांनी फिर्यादींना लोखंडी पाइप आणि बांबूने डोके आणि हाता-पायावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी संगनमत करुन गुन्हा केल्याचे दिसून येत असून फरार आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकीलांनी केली होती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा