पुणे : भांडण सोडविणाऱ्यावर कोयत्याने वार

पुणे – साडुचे भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस रस्त्यावर अडवून कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना जनवाडी परिसरात पीएमसी कॉलनीतील कुसाळकर चौकात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

सुनील कुसाळकर (38, रा. वडारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेखर शेट्टी कुसाळकर (रा. पीएमसी कॉलनी, जनवाडी) याच्याविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील कुसाळकर यांचा साडु सुरेश कुसाळकर याचे शेट्टी कुसाळकर याच्यासोबत भांडण झाले होते. फिर्यादी सुनील कुसाळकर हे शनिवारी त्यांचे साडु सुरेश यांच्या घरी गेले होते. दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर शाम धोत्रे यांनी कॉल केला तसेच भांडणे सोडविण्यासाठी जनवाडीतील कुसाळकर चौकात या असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे त्यांचा साडुचा मुलगा अक्षय याच्यासोबत सदर ठिकाणी जात असताना शेखर शेट्टी कुसाळकरने त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करीत गंभीररीत्या जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक पी. आर. वाघमारे पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)