पुणे – ब्रेकडाऊन रोखण्यासाठी डेपोंना सूचना

– वाहतूक पोलिसांच्या पत्राची पीएमपीएमएल प्रशासनाकडून दखल

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस ब्रेकडाऊनचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. सातत्याने रस्त्यावर बस बंद पडत असल्याने वाहतूक पोलिसांनीही यासंदर्भात पीएमपीला पत्र लिहले होते. यामुळे पीएमपी प्रशासनाने यावर गंभीर होत आता सर्व डेपोंना सूचना केल्या आहेत. सीएनजी, डिझेलअभावी देखील काही बसेस मार्गावर येत नाहीत यामुळे बसेस बंद राहण्याचे नेमके कारण काय? याबाबत डेपो मॅनेजरला सूचना करण्यात आल्या असून माहिती ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेस मार्गावर बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांत जवळपास 29 हजार बसेस मार्गावर बंद पडल्या असून यामध्ये ठेकेदारांच्या बसेसची संख्या सर्वाधीक आहे. याबाबत ठेकेदारांना वेळोवेळी दंडही केला जात आहे. मात्र, तरीदेखील ब्रेकडाऊनच्या प्रमाणात घट होत नसून अनेक बसेस मार्गावर बंद पडत आहेत. रस्त्यावरच बसेस बंद पडल्याने पाठीमागे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे वाहतूक नियमन करताना अडचणी येत असल्याने वाहतूक पोलिसांनी देखील यासंदर्भात पीएमपीएमएलला पत्र पाठवून यावर उपाय शोधण्याचे सांगितले होते. यामुळे आता ब्रेकडाऊन बाबत प्रशासन गंभीर झाले असून सर्व डेपो मॅनेजरला सूचना देण्यात आल्या आहेत. विविध कारणांमुळे बसेस बंद राहातात. यामध्ये सीएनजी, डिझेल नसल्याने देखील काही बसेस बंद ठेवण्यात येतात. तर, काहीवेळा चालक-वाहकाने हलगर्जीपणा केल्यानेदेखील बस बंद राहाते. यामुळे मार्गांवरील बसेसची संख्या कमी होऊन पर्यायाने फेऱ्याही रद्द कराव्या लागतात. याबाबत सर्व डेपो मॅनेजरला सूचना करण्यात आली असून बस मार्गावर न येण्याचे नेमके कारण काय? याबाबत माहिती जमा करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे पीएमपीएमएलने ब्रेकडाऊनबाबत गंभीर होत पाऊले उचलण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)