पुणे – बेदरकार वाहने चालविणे पडणार बाराच्या भावात

वाहनचालकांवर होणार गुन्हे दाखल

पुणे – नो एंट्रीतून भरधाव वाहने चालवत स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्‍यात घालणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपासून थंडावलेली ही मोहीम वाहतूक पोलिसांकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावरील वेड्यावाकड्या वळणातून सुसाट जाणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघात होण्याची शक्‍यता जास्त असते. नो एंट्री, रॉग साईडने, हयगयीने व अविचाराने जोरदार वाहन चालवणायांवर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे. शहरातील वाहतूक परिस्थिती पाहता काही महिन्यांपूर्वी या कारवाईचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अनेक वाहनचालकांचे परवाने जप्त करुन त्यांच्यावर खटलाही भरण्यात आला. परंतु, थोड्याच दिवसांत ही कारवाई थंडावली. यामुळे पुन्हा अशा वाहनाचालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्याने कार्यभार सांभाळणारे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुन्हा ही कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)