बेळगाव: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळमठ इथे बस उलटून दोन जण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त बस बेळगावहून हुबळीच्या दिशेनं निघाली होती. त्यात १८ प्रवासी होते. उतारावरून जात असताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बसचा ब्रेकच लागत नव्हता. त्यामुळे ड्रायव्हरने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुभाजकाला आदळून ही बस उलटली. त्यात दोघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये बसचालक अशोक धुंडी (५०) यांच्यासह एका वृद्ध प्रवाशाचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त कळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी तिथं धाव घेतली. थोड्याच वेळात येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)