पुणे – “बीडीपी’तून वगळणार बाणेर गावठान

लोकप्रतिनिधींसोबत करण्यात आली पाहाणी : बांधकाम करण्याचा मार्ग खुला होणार

औंध – बाणेर गावातील 3 एकर क्षेत्र बीडीपीमधून वगळण्याबाबत शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष व स्थानिक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसोबत नुकतीच पाहणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाणेरगाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकास आराखड्यामध्ये बाणेरगावातील 3 एकर जमीन, त्यातील एकूण 113 घरे व ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचा काही भाग येत होता. यावर बीडीपी झोन टाकण्यात आला होता. गावातील भैरवनाथ मंदिराचा भाग व रहिवासी घरे यातून वगळण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका ज्योती कळमकर व स्वप्नाली सायकर यांनी केली होती. गावठाणातील एकूण 113 घरावरती बीडीपी झोन टाकल्यामुळे नागरिकांना घराची दुरुस्ती व नवीन बांधकाम करणे शक्‍य होत नव्हते. तसेच महापालिकेचा देखील डेव्हलपमेंट चार्ज व टॅक्‍स मोठ्या प्रमाणात बुडत होता.

बाणेरचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार यामुळे रखडला होता. ही बाब लक्षात आल्यावर कळमकर व सायकर यांनी पालिकेमध्ये ठराव मांडून हा भाग बीडीपी झोनमधून काढून त्या जागी निवासी झोन करावा, अशी मागणी केली होती.

नगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या की, बाणेर परिसरातील बीडीपी झोन निवासी करण्याचे प्रयत्न आहेत, त्यामुळे नागरिकांना आता घरे दुरुस्ती व बांधकाम करण्याचा मार्ग लवकरच खुला होईल. याप्रसंगी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष नगरसेवक सुशील मेंगडे, नगरसेवक अमोल बालवडकर, शीतल लांडगे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, अॅड आशिष ताम्हाणे व बांधकाम अधिकारी उपस्थित होते.

भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करताना ही बाब लक्षात आली. मंदिराचा काही भाग बीडीपी झोनमध्ये दाखविण्यात आला आहे. नागरिकांची घरे बीडीपी झोनमध्ये येत असल्यामुळे त्यांना घरे दुरुस्ती व नवीन घरे बांधता येत नव्हते. तसेच पालिकेचा टॅक्‍स व डेव्हलपमेंट चार्ज देखील यामुळे बुडत आहे.
– ज्योती गणेश कळमकर, नगरसेविका.


या परिसरातील नागरिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच बाणेर गावठाणातील बीडीपी झोन कमी करण्याचा निश्‍चित प्रयत्न केला जाईल.
– सुशील मेंगडे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)