पुणे बार असोसिएशन अध्यक्ष पदाची निवडणूक चौरंगी

अंतिम चित्र स्पष्ट : 17 फेब्रुवारी रोजी होणार मतदान

पुणे – जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. यंदा अध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार आहे. हणमंत करजगीकर, भजनलाल निमगावकर, सुभाष पवार आणि प्रवीण येसादे यांच्यात ही निवडणूक होणार आहेत.

निवडणुकीसाठी शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल आणि नवीन बिल्डींगच्या बार रुममध्ये 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष पदाच्या 2 जागांसाठी भुपेंद्र गोसावी, संजीव जाधव, रेखा करंडे (दांगट), ईब्राहिम शेख, सचिन झालटे (पाटील) हे पाच जण नशिब अजमावत आहेत. तर सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत श्रीकृष्ण घुगे, लक्ष्मण घुले, गीतांजली कडते, विकास कांबळे, संतोष शिंदे आणि नगमा टंडन या सहा उमेदवारांमध्ये होणार आहे. खजिनदार पदासाठी पूनम स्वामी आणि प्रतापराव मोरे रिंगणात आहेत. हिशेब तपासणीस पदाची लढत नागेश जेधे आणि सुदाम मुरकुटे यांच्या होणार आहे.

-Ads-

पुणे बार असोसिशनचे माजी अध्यक्ष अॅड. एन.डी.पाटील या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. अॅड. शिरीष शिंदे, अॅड. श्रीकांत आगस्ते, अॅड. हेमंत गुंड, अॅड. अभिजित भावसार, अॅड. सुप्रिया कोठारी, अॅड. अमोल जोग, अॅड. काळूराम भुजबळ आणि अॅड. रवि पवार हे उपमुख्य निवडणूक अधिकारी आहेत.

दहा कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड

कार्यकारिणी सदस्य पदासाठी चेतन औरंगे, समीर भुंडे, अशिष गवारे, पंजाब जाधव, गणेश लेंडे, लक्ष्मी माने, प्रियदर्शनी परदेशी, योगेश पवार, रमेश राठोड आणि रफिक शेख या दहाजणांची निवड झाली आहे. सर्वानुमते ही निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य पदासाठी 31 अर्ज आले होते. त्यापैकी 6 अर्ज नामंजुर झाले. 25 अर्ज मंजुर झाले. त्यामध्ये 21 पुरूष उमेदवार होते. तर चार महिला उमेदवार होते. 21 पुरूष उमेदवारांपैकी पैकी 8, 4 महिला उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची चिठ्ठी पध्दतीने निवड करण्यात आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)