पुणे बार असोसिएशनची अनाथ मुलांसोबत आईस्क्रीम पार्टी

पुणे- वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने श्रीवत्स संस्थेतील अनाथ मुलांसोबत आईस्क्रीम पार्टी साजरी केली. त्यावेळी आईस्क्रीमसोबत मुलांना खाऊ आणि फळांचे वाटप करण्यात आले. शिवाजीनगर न्यायालयात उन्हाळी सुट्टीच्या पूर्वसंधेला वकील, न्यायाधीशांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे आईस्क्रीम पार्टीचे आयोजन केले जाते. यावर्षीही शुक्रवारी सायंकाळी न्यायालयात आईस्क्रीम पार्टी झाली. मात्र, यावर्षी त्यापूर्वी बार असोसिएशनकडून श्रीवत्स संस्थेतील मुलांसोबत आईस्क्रीम पार्टी आयोजित करण्यात आली. त्यावेळी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, श्रीवत्स संस्थेच्या शर्मिला सय्यद, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोष शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, ऍड. शिरीष शिंदे, ऍड. रुपेश कलाटे, ऍड. नितीन झंजाड यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)