पुणे बार असोसिएशनचा उद्या बंद

– ज्येष्ठ वकिलाला मारहाण केल्याचा निषेध
– पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स संघटनाही सहभागी
– द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचाही पाठिंबा

पुणे, दि. 13 (प्रतिनिधी) – शिवाजीनगर न्यायालय परिसरात ज्येष्ठ वकिलाला माजी नगरसेवकाने मारहाण केल्याप्रकरणी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने उद्या (सोमवार, दि. 14 ऑगस्ट) बंद पुकारण्यात आला आहे. वकिलांनी कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र दौंडकर आणि उपाध्यक्ष ऍड. हेमंत झंजाड यांनी दिली.

ज्येष्ठ वकील राजेंद्र विटणकर एका दिवाणी दाव्यामध्ये कॉंग्रेसचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड याची उलट तपासणी घेतली. त्यानंतर गायकवाड यांनी ऍड. विटणकर यांना बुधवार दि. 9 ऑगस्ट रोजी मारहाण केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप गायकवाड याला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे पुणे बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. यासंबंधीइ झालेल्या निर्णयावेळी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. संतोष जाधव, सचिव ऍड. विवेक भरगुडे, ऍड. आशिष ताम्हाणे, हिशोब तपासणीस ऍड. कुमार पायगुडे, खजिनदार ऍड. दत्ता गायकवाड यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कैलास गायकवाड याचे जिल्ह्यातील कोणत्याही वकिलाने वकील पत्र स्वीकारू नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनकडून यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यातूनही कोणी गायकवाड याचे वकील पत्र स्वीकारले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे बार असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या बंदला धर्मादाय आयुक्तालय येथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन आणि द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष ऍड. अमृता गुरव-देशमुख आणि विश्‍वस्त ऍड. शिवराज कदम-जाहगिरदार यांनी यासंबंधीचे पत्र नुकतेच काढले आहे. फॅमिली कोर्ट लॉयर्सचे अध्यक्ष ऍड. गणेश कवडे यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)