पुणे-बारामती मार्गावर ‘शिवशाही’च्या 26 फेऱ्या

पुणे- गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन पुणे ते बारामती शिवशाही बस सुरू करण्यात आली. स्वारगेट आगार येथून शनिवारपासून (दि.28) सकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊदरम्यान दर अर्ध्या तासाने ही वातानूकुलीत शिवशाही आता सुरू झाली आहे.

स्वारगेट बसस्थानकातूून शिवशाही बसच्या बारामतीसाठी दररोज 26 फेऱ्या होणार आहेत. ही सेवा विनावाहक-विनाथांबा अशा स्वरूपाची असणार आहे. शिवशाही बसचे प्रवास भाडे हे सामान्यांना परवडत असल्याने तिला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे ते बारामतीदरम्यान प्रौढ व्यक्तीसाठी प्रत्येकी 161 रुपये व पाच वर्षांखालील मुलांसाठी 82 रुपये तिकीट असणार आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)