पुणे-बारामती-पुणे पॅसेंजर दहा दिवस रद्द

पुणे -पुणे ते दौंड स्थानकादरम्यान लोहमार्ग देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहेत. दि. 1 ते 10 सप्टेंबरदरम्यान या मार्गावर दररोज दुपारी तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे-बारामती दरम्यान धावणारी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.

पुणे-बारामतीसाठी सकाळी 7.10 व बारामती-पुणे सकाळी 10.40 वाजता सुटणारी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. काही रेल्वेंच्या वेळेत काही अंशी बदल होणार आहे. 11046 अमरावती-पुणे एक्‍स्प्रेस दौंड स्थानकात मंगळवारी सुमारे 50 मिनिटे व रविवारी 1 तास 50 मिनिटे थांबविण्यात येणार आहे. तर 17014 हैद्राबाद-पुणे एक्‍स्प्रेस दौंड स्थानकात दीड तास व 01656 जबलपूर-पुणे विशेष रेल्वे दौंड स्थानकात 50 मिनिटे थांबविली जाणार आहे. यामुळे काही प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)