पुणे: बाजारात नियमांची अंमलबजावणी काटेकोर झाली पाहिजे

पालकमंत्री गिरीश बापट – कृषीविषयक कार्यशाळा संपन्न

पुणे – बाजारातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. नियमांमध्ये जर कोणी अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. बाजार समितीने घेतलेल्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी झाली पाहिजे. काही निर्णयांची अंमलबजाणी होत नसल्यास त्याची चौकशी केली पाहिजे, असे मत अन्न, औषध प्रशासन तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अन्न, औषध प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अन्न सुरक्षा व मानके कायदा अधिनियम 2006 अंतर्गत फळे, भाजीपाला, गुळ-भुसार व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या तरतुदींची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. त्यावेळी व्यवसायिकांना प्रातिनिधीक स्वरूपात परवाना वाटप करण्यात आले. आमदार माधुरी मिसाळ, बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भुषण तुपे, दि पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, नगरसेवक प्रवीण चोरबेले, अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले की, बाजारातील, शेतकरी, व्यापारी, कामगार, तोलणार, फुलबाजार, पार्किंग, कचऱ्याची विल्हेवाट आदी सर्व प्रश्‍न सुटले पाहिजेत. यासाठी येत्या 25 मे रोजी बैठक घेणार आहे. त्यामध्ये जे निर्णय होतील. त्या निर्णयांची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यात करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)