पुणे: बांधकाम व्यावसायीक महिलेची साडेनऊ कोटींची फसवणूक

पुणे – एका बांधकाम व्यावसायीक महिलेची साडेनऊ कोटींची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिच्या भागीदाराविरुध्द अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रेमलता कुलकर्णी (72, रा. पाषाण रोड) या दि नेस्ट कंन्स्ट्रक्‍शन संस्थेत भागीदार आहेत. यातील भागीदार चारुदत्त जोशी याला संस्थेने विश्‍वासाने भागीदारी संस्थेचे खाते चालविण्याचा अधिकार दिला होता. मात्र त्याने फिर्यादी व इतर भागीदारांच्या संमतीशिवाय संस्थेच्या बॅंक खात्यातून फेब्रुवारी 2014 ते जुन 2017 दरम्यान 9 कोटी 50 लाख रुपयांचा अपहार केला. ही सर्व रक्कम त्याने स्वत:च्या खात्यात वर्ग केली. यासंदर्भात प्रथम तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यावरून तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. एस. देशमुख तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)