पुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच

पुणे – कडाक्‍याच्या उन्हात प्रवाशांना थांबण्यासाठी अनेक ठिकाणी बसथांबे नाहीत. मात्र, असे असतानाच; दुसऱ्या बाजूला एकाच ठिकाणी दोन बसथांबे उभारण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे ही कामे नेमकी कोण्याच्या फायद्यासाठी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सिंहगड रस्त्यावर राजारामपूल चौक येथे अवघ्या वर्षभरापूर्वीच बस थांबा उभारण्यात आला आहे. या बसथांब्याच्या मागील बाजूस आणखी एक बसथांबा उभारण्याचे काम पीएमपीकडून सुरू आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनावश्‍यकपणे बसथांब्यांसाठीची उधळपट्टी सुरूच असल्याचे चित्र आहे.

पीएमपीचे शहरात सुमारे 1,800 बसथांबे असून त्यातील जेमतेम 800 ते 900 बसथांब्यांच्या ठिकाणी प्रवाशांसाठी शेड असून उर्वरित ठिकाणी प्रवासी भर उन्हात उभे असतात. त्यामुळे प्रवाशांकडून सर्व ठिकाणी सावली मिळेल असे बसथांबे उभारण्याची मागणी केली जात आहे. तर, दुसऱ्सा बाजूला आमदार निधी, खासदार निधी तसेच नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीत निधीसह पीएमपीकडून लाखो रुपये खर्चून कोणतीही गरज न ओळखता बसथांबे उभे केले जात आहेत. त्याचा प्रत्यत पुन्हा एकदा राजाराम पुलावर आले.

3 वर्षांत 3 बसथांबे
राजाराम पुलाजवळ महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या बाजूला दोन वर्षांपूर्वी साधा बस थांबा तोदेखील पदपथावर उभारण्यात आला. मात्र, त्याला छतच लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अवघ्या वर्षभरातच प्रशासनाने येथे दुसरा बसथांबा रस्त्यावर उभारला. त्यामुळे प्रवाशांची सोय होईल, असे सांगत जुना बसथांबा काढून घेण्यात आला. त्यानंतर आता मागील वर्षी बसविलेल्या स्टेनलेस स्टीलच्या बसथांब्याला वर्षही होत नाही. तोपर्यंत पुन्हा एकदा पदपथावर नवीन बसथांबा बसविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून हा थांबा पदपथावर लावत पादचाऱ्यांची वाट अडविण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)