पुणे – बनावट शासकीय आदेश तयार करून फसवणूक; नायब तहसीलदार अटकेत

जमीन घोटाळाप्रकरणी अन्नधान्य वितरण महिला अधिकारी अटकेत

पुणे – बनावट शासकीय आदेश तयार करून 60 एकरांपेक्षा अधिक शासकीय जमिनींचे बेकायदा हस्तांतरणप्रकरणी दोन वर्षांपूर्वी दाखल गुन्ह्यात शिरुरमधील तत्कालिन नायब तहसीलदार आणि अन्नधान्य वितरण कार्यालयातील अधिकारी गीतांजली गरड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात गरड यांचा बनावट शासकीय आदेश तयार करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुधवारी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना सायंकाळी समर्थ पोलिसांकडून अटक करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुनर्वसन अधिकाऱ्याच्या कार्यालयातील लिपीक चंद्रशेखर ढवळे याने बनावट आदेश तयार केले. हे आदेश खरे असल्याचे दाखवत सुभाष कारभारी नळकांडे (बुरुंजवाडी, ता.शिरुर) याने त्याचा वापर करत आदेशावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या नावे शिरुर तहसील कार्यालयातील पुनर्वसन लिपीक रमेश वाल्मिकी याने खोटे अर्ज तयार केले. त्यावर कारवाईचे अधिकार नसताना तहसीलदार यांच्या परस्पर तत्कालिन नायब तहसीलदार गरड यांनी त्यांचे शेरे घेतले. त्या नोंदी तत्कालिन मंडल अधिकारी बळीराम खंडूजी कड याने न तपासात प्रमाणित केले. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा खोटा अर्ज तयार करून त्यांनी शासन प्रदान जमिनींचा भोगवटा वर्ग बदलण्यासाठीचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा वरिष्ठांना असताना ते शिरूर तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. त्या सर्व अर्जांवर गरड यांनी शेरे मारले. त्याआधारे शासकीय जमिनीचे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या नावे झालेल्या जमिनींचे भोगवटा वर्ग बदलाचे गावकामगार तलाठी कासारी काळे याने फेरफार रजिस्टरी नोंद केले. त्यामुळे अशा जमिनी पुन्हा सर्वसामान्यांना विकल्या गेल्या. यात 60 एकरपेक्षा अधिक शासकीय जमीनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण झाले आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडके, अपर पोलीस आयुक्त पश्‍चिम प्रादेशिक विभाग रवींद्र सेनगावकर, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेश बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)