पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक ; चौघांविरुद्ध गुन्हा

पुणे- झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) पात्रता यादीमध्ये अपात्र ठरलेल्या चौघांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी “एसआरए’च्या विकसकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी शब्बीर दादामिया शेख (वय 52, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विकसक केतन जयंतीलाल वीरा (रा. कल्याणीनगर) यांच्यासह रुपाली कैलास जाधव, राकेश भैरवनाथ जाधव, नरेंद्र दत्तू कांबळे व संदीप प्रकाश कांबळे (सर्व रा. भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भवानी पेठेतील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीच्या “एसआरए’ प्रकल्पासाठी अपात्र ठरलेले असतानाही त्यांना वीजजोड दिल्याचे फिर्यादी व पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत महावितरणकडे तक्रार केली. त्यांनी कारवाईकडे टाळाटाळ केल्यानंतर हे प्रकरण राज्य विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी त्यास दुजोरा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)