पुणे – बनावट आधार, पॅनकार्डद्वारे फसवणारा जेरबंद

पुणे – बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून फसवणाऱ्या सराईत गुन्हेगारास मुंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. राहुल नागनाथ ईप्पर (28, रा. ओमसाई सोसायटी, हडपसर) असे सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून 51 हजार 690 रुपयांचा सीपीयु, प्रींटर, स्कॅनर व बनावट आधारकार्ड असा मुद्देमाल हस्तगत केला.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस शिपाई शाम शिंदे यांना राहुल ईप्पर हा केशवनगर येथील साईबाबा बिझनेस ब्रॅन्डींग सर्व्हिसेस या दुकानात नागरिकांना हवे त्या कामासाठी त्यांच्या मुळ कागदपत्रावरून बनावट सरकारी दस्तऐवज केवळ 500 रुपयांत बनवून देतो तसेच मुळ आधारकार्ड व पॅनकार्डमधील फोटो, नाव, पत्ता, जन्मतारीख यांच्यामध्ये हवा तो बदल करून देतो अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केल्यानंतर त्याच्या दुकानावर छापा टाकण्यात आला. तेथून कागदपत्रे तयार करण्यासाठी लागलेले साहित्य हस्तगत करण्यात आले. त्याच्यावर यापूर्वी औरंगाबाद, लातुर आणि अहमदनगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गवळी, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस शिपाई काकडे यांच्या पथकाने केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)