पुणे : बक्षीस रकमेवरून ‘मॅरेथॉन’वाद सुरु

महापौरांसह स्थायीच्या अध्यक्षांचे आदेश माजी आयुक्तांनी डावलले

पुणे- पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची मान्यता भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने नाकारली. त्यानुसार या स्पर्धेसाठी महापालिकेने बक्षिसांची रक्कम देऊ नये, अशा सूचना महापौर मुक्ता टिळक यांच्यासह तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिले होते. मात्र, तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी जाता-जाता स्पर्धेच्या संयोजकांवर मेहरनजर केल्याचे समोर आले आहे. त्यामुुळे नवीन वाद सुरू होणार आहे.

महापौरांसह तत्कालिन स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश डावलत बक्षिसांची तब्बल 32 लाख 22 हजार रुपयांची रक्कम स्पर्धेच्या कुणार कुमार यांनी स्पर्धा आयोजकांना दिली. धक्कादायक बाब म्हणजे, कुमार यांनीच पालिकेच्या क्रीडा धोरणात या स्पर्धेसाठी तरतूद नसल्याचे सांगत ही बक्षिसे देण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतरही आयुक्तांनी या स्पर्धेवर मेहरनजर का दाखविली, याबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या रविवारी आंतराष्ट्रीय पुणे मॅराथॉन भरविली जाते. याला मान्यता नसल्याचे स्पष्ट करत स्पर्धेत धावपटूंनी सहभागी होऊ नये, असा सल्ला भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने या दिला. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनावरच प्रश्‍न होता. त्यातच या स्पर्धेला गेल्या अनेक वर्षांपासून पालिका निधी देते. यासाठी अर्थसंकल्पात 34 लाख रुपयांची तरतूद होती. तर याच वर्षी स्पर्धेच्या संयोजकांकडून यापुढील प्रत्येक विद्यमान महापौर या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष असणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र, या स्पर्धेवरून वाद निर्माण झाल्याने “स्पर्धेच्या मान्यता तपासून तसेच कायदेशीर बाजू तपासूनच बक्षिसांची रक्कम द्यावी. तसेच याबाबत आम्हाला आधी कल्पना द्यावी’ असे स्पष्ट आदेश महापौरांसह तत्कालिन स्थायी समिती अध्यक्षांनी दिले होते.

या स्पर्धेला जिल्हा संघटना, राज्याच्या संघटनेसह हौशी ऍथलेटिक्‍स संघटनेची मान्यता असल्याचे प्रशासनाने तत्कालिन आयुक्तांना कळवत बक्षीस रक्कम देण्याचा प्रस्ताव ठेवला. कुणाल कुमार यांनीही गाजावाजा न करता तसेच महापौरांना कल्पना न देता 32 लाख 22 हजार रुपयांची रक्कम आयोजक संघटनेस दिली आहे. त्यामुळे या स्पर्धेवरून पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे.

या स्पर्धेला मान्यता नसल्याचे भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने स्पष्ट केले. त्यानंतर स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम थांबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. या संघटनेच्या मान्यतेची माहिती तसेच बक्षिसांची रक्कम द्यायची असल्यास त्याची माहिती आधी आम्हाला द्यावी, असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतरही ही रक्कम देल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत आपण सर्व कागदपत्रे मागविली होती. मात्र, प्रशासनाने आम्हाला अंधारात ठेऊनच हा निर्णय घेतला. त्याचा सविस्तर अहवाल मागविला जाईल
– मुक्‍ता टिळक, महापौर.


मॅरेथॉन स्पर्धेला पैसे देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आल्यानंतर त्याला स्पष्ट नकार दिला होता. तसेच पैसे देऊ नये, असेही प्रशासनाला बजावले होते. त्यानंतरही ही रक्‍कम देण्यात आली आहे. याबाबत तातडीने संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
– मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)