पुणे – फोन कॉलमुळे पोलिसांची उडाली धांदल

तिहेरी खून झाल्याची दिली माहिती : तपासाअंती अफवा असल्याचे निष्पन्न

पुणे – पुण्यात महिनाभरात सातत्याने खुनाच्या 14 घटना वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर मागील दोन ते तीन दिवसापूर्वी खुनाचा प्रकार घडलेला असतानाच, कोथरुड पोलिसांना एका अज्ञात इसमाने फोन करून तिहेरी खून झाल्याचा प्रकार घडल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पोलीस ठाण्यातील सर्व यंत्रणा खडबडून जागी होत घटनास्थळाकडे धावली. मात्र, तपासाअंती असा काही प्रकार घडलाच नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी निश्‍वास सोडला. एका मनोरुग्णाने पोलिसांना अशाप्रकारे अफवेचा फोन केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीस समज दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोथरुड पोलिसांना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. हा फोन घेतलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास समोरील व्यक्तीने “एका नगरसेवकाने त्याची आई, पत्नी आणि बहीण यांना धारदार हत्याराने मारले असून तिघांचे मृतदेह कचऱ्यात आणि पाण्याजवळ टाकून दिले’ असल्याचे सांगितले. नगरसेवकाने अशाप्रकारचे कृत्य केल्याचे समजल्याने एकूण पोलिसांची धावपळ उडाली आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी धावले. मात्र, सुमारे अर्धातास सर्वत्र तपास करूनही कुठेही मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे याबाबत संबंधित फोन करणाऱ्या 33 वर्षीय इसमाकडे पोलिसांनी विचारणा केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. मागील काही दिवसांत खुनाच्या बातम्या सातत्याने वाचत असल्याने हा प्रकार केल्याची त्याने कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)