पुणे फेस्टिव्हल “इंद्रधनू’मध्ये युवा कलाकारांचा जल्लोष

पुणे  – पुणे फेस्टिव्हलमध्ये उगवत्या व नवोदीत कलाकारांसाठी असणारा “इंद्रधनू भाग 1′ कार्यक्रम सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी 5 ते 8 यावेळेत मोठ्या जल्लोषात पार पडला. युवा कलाकारांच्या मोठ्या प्रतिसादामुळे “इंद्रधनू भाग 1′ हा कार्यक्रम दोन भागात घेतला जात असून शंभरहून अधिक कलाकारांनी त्यात सहभाग घेतला. त्याचा दुसरा भाग आज सायंकाळी 5 ते 8 यावेळेत बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडेल.

कालच्या  “इंद्रधनू’मध्ये शास्त्रीय संगीत व नृत्य, समूह नृत्य, चित्रपट संगीत, पीयानो – तबला – सिंथेसायझर – हार्मोनियम – गिटार वाद्यवादन, भारतीय व पाश्‍चमात्य संगीतावर आधारीत नृत्य, नाट्यछटा, पोवाडा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची दिलखेचक झलक या युवा कलाकारांनी दाखवली. त्यातील अनेकांना रसिक प्रेक्षकांचा वन्स मोअर मिळाला.

“इंद्रधनू’चे संयोजक रविंद्र दुर्वे यांनी याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलतर्फे सर्व कलाकारांना शुभेच्छा देऊन म्हटले की, “”पुणे फेस्टिव्हलमधील “इंद्रधनू’ कार्यक्रमात 15 ते 25 वर्षे वयोगटातील युवा कलावंत सहभागी होत असतात. त्यांच्या दृष्टीने हे मोठे व्यासपीठ असून यातून अनेक कलावंत आज देश पातळीवर चमकत आहेत. तसेच उत्तम कलाकार म्हणून चांगले उत्पन्न ही मिळवत आहेत, ही समाधानाची बाब आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत तरूण कलावंतांसाठीचा हा एका अर्थाने “प्रज्ञाशोधच’ मानावा लागेल आणि असा प्रयत्न करणारा पुणे फेस्टिव्हल हा कदाचीत एकमेव सांस्कृतिक महोत्सव असावा असे ते म्हणाले. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)