पुणे – फुलबाजार 36 तास अंधारात

शेतकरी, आडते, पक्षकारांचे हाल : सोमवारी वीजपुरवठा सुरळीत

पुणे – मार्केट यार्डातील फुल बाजारातील वीज दीड दिवस गायब झाली होती. रविवारी (दि.27 जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास गायब झालेली वीज थेट सोमवारी दुपारी 1 वाजता आली. त्यामुळे तेथील बाजार घटकांना सोमवारी अंधारातच सर्व व्यवहार करावा लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी वीज गेली, त्यावेळी व्यापार संपला होता. मात्र, सोमवारी आडते, शेतकरी आणि खरेदीदारांची मोठी गैरसोय झाली. पहाटेपासूनच येथील व्यवहार सुरू होत असतात. बाजारातील आतील बाजूतील अनेक गाळ्यांवर अंधार असतो. तेथे दिवसाही वीज लावावी लागते. तर सरासपणे सर्व गाळ्यांवर इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यांचा वापर केला जातो. रविवारी दुपारपासून वीज असल्याने वजन काट्यांवरील बॅटरी बॅकअप कमी झाले होते. त्यामुळे अनेक गाळ्यांवरील वजनकाटे बंद पडले होते. त्यामुळे बाजारात धीम्या गतीने व्यापार सुरू होता. दोन ते तीन अडते एकाच वजन काट्यावर फुलांचे वजन करून पट्ट्या बनवित असल्याचे चित्र होते. वीज नसण्याच्या प्रकाराबाबत बाजार घटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी एक वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.

मार्केट यार्डातील भुसार विभागातील दत्त मंदिराजवळील अंडरग्राऊंड केबल तुटली होती. त्यामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. याबाबत रविवारी (दि. 27 जानेवारी) दुपारपासूनच युद्धपातळीवर वीज पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. सोमवारी (दि.28) दुपारी एक वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
– प्रदीप काळे, विभागप्रमुख, फूलबाजार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)