पुणे : फिनिक्‍स मॉलविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

वडगावशेरी- नगर रोडवरील फिनिक्‍स मॉल प्रशासनाने तृतीयपंथी नागरिकाला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याबद्दल वडगाव शेरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मॉलबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी या घटनेचा निषेध व्यक्‍त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून मॉल प्रशासनाने झालेल्या घटनेबद्दल माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादीने हे आंदोलन मागे घेतले.

ट्रान्सजेंडर्स या समाजाचाच एक घटक आहेत. त्यांना त्यांचे मुलभूत हक्‍क मिळालेच पाहिजे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी देखील प्रवेश नाकारणे ही आधुनिक काळातील “लैंगिक अस्पृश्‍यता’ आहे. याच्या विरोधातील लढ्यास माझा पाठींबा आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कालच ट्विट केले होते. मॉलचे जनरल व्यवस्थापक दितीमन कबाडे यांना निवेदन देण्यात आले. ते म्हणाले की, त्या दिवशी सुरक्षा रक्षकाकडून चुकून सोनाली यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबद्दल दिलगिरी व्यक्‍त करीत असून यापुढे कोणालाही प्रवेश नाकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी या घटनेचा निषेध व्यक्‍त करून पुन्हा असा प्रकार झाला तर फिनिक्‍स मॉलला धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडगावशेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नारायण गलांडे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार असून दोन दिवसांपूर्वी फिनिक्‍स मॉलकडून तृतीयपंथी सोनाली यांना खरेदी करण्यापासून रोखण्यात आले आहे. ही निषेधार्थ बाब आहे.
यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नारायण गलांडे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव यांच्यासोबत भीमराव गलांडे, बाबासाहेब गलांडे, सोमनाथ साबळे, मयूर गलांडे, सदाशिव गायकवाड, संजय गलांडे, मायकल मिरपगार, नितीन राठोड, दादा कांबळे, कृष्णा नायर, महेंद्र कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)