पुणे: फिडर पिलरमध्ये साप शिरल्याने शार्टसर्कीट

पाच वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित : 12 हजार वीजग्राहकांना फटका
जाईंट व केबल दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू
दुपारी पावनेतीन वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश

पुणे – उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 22 केव्ही वीजवाहिनीच्या फिडर पिलरमध्ये साप शिरल्याने शार्टसर्कीट झाले. त्यामुळे पाच वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचा सोमवारी हा प्रकार घडला. पर्यायी वीजपुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी भारव्यवस्थापन शक्‍य न झाल्याने धायरी परिसर, डिसके विश्‍व व नांदेडमध्ये सकाळी 9.35 ते दुपारी 2.55 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून खडकवासला क्र. 1 व क्र. 2 वाहिनीद्वारे खडकवासला उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. तसेच खडकवासला उपकेंद्रातून बाहेर जाणाऱ्या एका वीजवाहिनीद्वारे डिएसके विश्‍व उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. सोमवारी सकाळी 9.35 वाजताच्या सुमारास खडकवासला क्र. 2 वाहिनीद्वारे होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे खडकवासला उपकेंद्रातील दोन आऊटगोईंग वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. या दोनपैकी एका वाहिनीवरून डिएसके विश्‍व उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा बंद झाल्याने या उपकेंद्रातील तीन आऊटगोईंग वाहिन्यांचा सुद्धा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी डिएसके विश्व, कोलेवाडी, नांदेड गाव, धायरीचा काही परिसर या भागातील 12 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न करण्यात आले पण उन्हामुळे विजेची मागणी अधिक असल्याने भारव्यवस्थापन शक्‍य होऊ शकले नाही.

सुमारे पाऊण तासाच्या पेट्रोलिंगनंतर गोयलगंगा गार्डनमधील 22 केव्ही खडकवासला क्र. 2 वाहिनीच्या फिडर पिलरमध्ये मोठा साप शिरल्याने शॉर्टसर्कीट झाल्याचे दिसून आले. हा साप जळाल्याने मृतावस्थेत दिसून आला. तसेच जाईंट व केबल जळालेले आढळून आले. दरम्यान फिडर पिलरमधील जाईंट व केबल दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. केबलच्या दुरुस्तीसह तीन ठिकाणी जाईंट लावल्यानंतर दुपारी 2.55 वाजता पाच वीजवाहिन्यांचा तसेच त्यावरील परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)