पुणे: प्रेयसीचा खून करून मृतदेह जंगलात फेकला

आरोपी गजाआड : वाघजाई डोंगर परिसरात आढळला मृतदेह

पुणे – ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करणा-या प्रेयसीचा गळा आवळून खून करण्यात आला. यानंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजे पोलिसांनी यातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यन, ही तरुणी मागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

प्रेरणा कांबळे (वय-19, रा. शिवणे, पुणे), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विपुल भवरलाल शहा (35) याला अटक करण्यात आली आहे.
प्रेरणा आणि विपुल यांच्यात काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. परंतू, प्रेरणा ही काही दिवसांपासून आरोपी विपुल याला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. या सर्व प्रकाराला कंटाळून आरोपी विपूल याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. तो एका मित्रासोबत तिला घेऊन फिरण्यासाठी म्हणून मुळशी परिसरात गेला होता. तेथे प्रथम कारमध्ये गळा आवळून तिचा खून करण्यात आला. यानंतर मृतदेह पौड पोलिसांच्या हद्दीतील वाघजाई डोंगर परिसरात तिचा मृतदेह फेकून दिला. वाघजाई डोंगर परिसरात पोलीसांना तिचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा गुन्हा पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने गुन्ह्याचा तपास पौड पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)