पुणे : प्रति व्यक्ती 200 लिटर पाणी मिळणार

पुणे : पुणेकरांना प्रति व्यक्ती 200 लिटर पाणी मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. ते म्हणाले, पुण्यासाठी 11.5 टीएमसी पाणी मंजूर आहे. महापालिका 15 ते 15.50 टीएमसी पाणी वर्षभर वापरत आहे. एका दिवसाला सुमारे 1200 ते 1300 एमएलडी इतके पाणी धरणातून उचलण्यात येते. 2016 दुष्काळ होता. या परिस्थितीमध्ये शहराला एक दिवसाआड पाणी देण्यात येत होते. अशा वेळी धरणातून रोज फक्त 800 एमएलडी इतके पाणी उचलण्यात आले.

शहरी भागात प्रति व्यक्ती प्रति दिन 150 लिटर इतका पाणीवापराचा निकष आहे. 24 बाय 7 या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 200 लिटर उपलब्ध होणार आहे. सध्या वापरात असलेल्या पाणीवापराच्या अर्धेच पाणी पुण्यासाठी लागणार आहे. या योजनेमध्ये पाण्याची बचत होणार आहे. योग्य व्यवस्थापन केले, तर पाण्याची बचत होईल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)