पुणे – प्रतिक कड यांना कोरियन संशोधन शिष्यवृत्ती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा माजी विद्यार्थी प्रतिक कड या विद्यार्थ्यांला दक्षिण कोरियातील पुसाण नॅशनल युनिव्हर्सिटीत पीएच.डी. संशोधनात्मक अभ्यासाकरीता शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रतिक याने गेल्या वर्षी पुणे विद्यापीठातील वातावरण आणि अवकाश शास्त्रे विभागातून पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आहे.

पदवीकेनंतर कड याने मान्सून बदलाचे समुद्र ऊष्माघातिकी आणि गतिमानता यावर होणारे परिणाम या विषयावर संशोधन केले होते . तो दक्षिण कोरियातील पुसाण नॅशनल युनिव्हर्सिटीतून “क्‍लायमेट सिस्टीम’ या विषयावर पीएच.डी. संशोधन करणार आहे. प्रतिक याचे शालेय शिक्षण चाकण येथील शिवाजी विद्यामंदिर येथे झाले आहे. तर, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. तसेच 2015 मध्ये कर्नाटकमधील म्हैसूर येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिरामध्ये पुणे विद्यापीठाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, याच विभागातील अन्य एका विद्यार्थिनीचा ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स नॅशनल युनिव्हर्सिटीत वातावरण शास्त्र अभ्यासासाठी पीएच.डी यासाठी निवड झाली आहे. दोघांची उच्च शिक्षणासाठी परदेशात झालेली निवड नवोदित संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे.
——————-

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)