पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून एकास गंडा  

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करून दोघांनी तरुणाकडील 58 हजार 230 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना पुणे-नगर रोडवर घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आदिनाथ निमसे (26, रा. संभाजीनगर, शिकारपुर, ता. शिरुर) हा 24 मार्च रोजी रात्री काम संपवून दुचाकीने राहत्या घरी चालला होता. यावेळी खराडी जकात नाका ते पुणे-नगर रोड दरम्यान त्याची दुचाकी दोघांनी अडवली. पोलीस असल्याची बतावणी करून त्याला हाताने मारहाण केली. यानंतर त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याची अंगठी व पाकिटातील 230 रुपये असा 58 हजार 230 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.

यासंदर्भात फिर्यादीने प्रथम ऑनलाईन तक्रार दिली होती. त्याची दखल घेतली न गेल्याने त्याने ई-मेलव्दारे तक्रार दिली. या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)