पुणे पोलिसांचे हरवलेल्या, सापडलेल्या वस्तुंसाठी पोर्टल

पुणे – पुणे पोलिसांनी हरवलेल्या व सापडलेल्या वस्तुंच्या माहितीचे पोर्टल सुरु केले आहे. सध्याच्या प्रचलित पद्धतीनूसार वाहन परवाना, मोबाइल आदी वस्तुंबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून त्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. या सर्वासाठी ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांच्यासाठी पोलीस आयुक्त रश्‍मी शुल्का यांनी पुणे पोलिसांच्या वेब साईटवर लॉस्ट ऍण्ड फाऊंड असे एक पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलद्वारे हरवलेल्या वस्तूसंदर्भात अर्ज स्वरुपात ऑन लाईन माहिती देवून तसेच प्रमाणपत्र व पावती घेण्याची सोय आहे. यामुळे हरवलेल्या वस्तूंसंदर्भात पोलीस स्टेशनला जाण्याची गरज राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)