पुणे – नागरिकांनो वाहतुकीचे नियम पाळा!

सहायक पोलीस आयुक्तांची धडक कारवाई : अल्पवयीनांसह बेशिस्तांवर कारवाई

पुणे – बेशिस्त वाहतुकीला वाहनचालकांकडून होणारे नियमाचे सर्रास उल्लंघनही जबाबदार असते. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडून रस्ते जाम होतात. अशा बेशिस्त वाहन चालवणाऱ्या आणि सोबत वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) न बाळगणाऱ्यांवर वाहतूक विभागाने मंगळवारी धडक कारवाई केली. यावेळी वाहन परवाना नसलेल्या अनेक दुचाकी जॅमर लावून अडवण्यात आल्या. यामध्ये 25 अल्पवयीन वाहनचालकांचा समावेश आहे. सर्वांनीच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडी होण्यास मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहनचालक जबाबदार असतात. वेगाने गाडी पळवणे, नियमांकडे दुर्लक्ष करणे, नो पार्किंगला वाहने लावणे यामुळे अनेकदा रस्ते जाम झालेले दिसून येतात.

गेल्या दोन दिवसांत शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून वाहतूक पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे दिसते. मंगळवारी टिळक रोडवरील अभिनव चौकात वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी स्वतः दोन तास हजेरी लावून बेशिस्त वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये गाडी चालवताना वाहन परवाना सोबत न बाळगणाऱ्या अनेक दुचाकींना जॅमर लावण्यात आला. अवघ्या अर्ध्या तासात विनापरवाना गाडी चालवणाऱ्या जवळपास वीस दुचाकी वाहतूक पोलिसांनी अडवून ठेवल्या. मुख्य सिग्नललाच ही कारवाई सुरू केल्याने अनेक बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात सापडले. टिळक रोडवरील मुख्य सिग्नल आणि वाहनचालकांची संख्या जास्त असल्याने जवळपास 12 ते 15 जणांची टिम याठिकाणी तैनात करण्यात आली होती. दरम्यान, यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे.

प्रत्येकाने नियमांचे पालन करून वाहन चालवणे गरजेचे आहे. बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना नियम माहित नसल्याने वाहतुकीत बिघाड होतो. वाहतुकीला शिस्त लावायची असल्यास सर्वांनीच नियम पाळणे आवश्‍यक आहे.

– प्रभाकर ढमाले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)