पुणे: पेट्रोल पंपाची रोकड लुटली

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील थरार : व्यवस्थापकावर कोयत्याने वारचोरटे कोंढव्याच्या दिशेने पळाल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा

पुणे – पेट्रोलपंपाची जमा झालेली रोकड नेणाऱ्या कारसमोर दुचाकी आडवी लावत चोरट्यांनी तब्बल 27 लाख 49 हजार रुपयांची रोकड लंपास केली. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी पेट्रोलपंप व्यवस्थापकावर उलट्या कोयत्याने वार करत त्याच्या पायाजवळील रोकड असलेली बॅग चोरली. हा सिनेस्टाईल थरार बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

भरदिवसा  लुटमार 
पेट्रोल पंप व्यवस्थापकाकडील रोकड लुटल्याची घटना समजताच मार्केटयार्ड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे व सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनीही घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे तपास करत आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीसांची तब्बल आठ ते नऊ पथके तयार केली आहेत. दरम्यान, भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर एवढी मोठी रोकड लुटल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहे.

याप्रकरणी पेट्रोलपंप व्यवस्थापक अजय परदेशी यांनी फिर्याद दिली आहे. पुणे-सातारा रस्त्यावर अहिल्यादेवी मटण शॉप चौकात नवसरवाल नावाचा पेट्रोलपंप आहे. शुक्रवारची दुपारनंतरची आणि शनिवार व रविवार बॅंकांना सुट्टी असल्याने त्या दोन दिवसांची 27 लाख 49 हजार रुपयांची रोकड पेट्रोलपंपामध्ये जमा होती.ती सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बॅंकेत भरण्यासाठी वॅगन-आर कारमधून चालक बर्नांड ऍन्थोनी आणि पेट्रोलपंप व्यवस्थापक अजय हे दोघे निघाले होते. ते बिबवेवाडी कोंढवा रस्त्याने त्यांच्या शंकरशेठ येथील दुसऱ्या पेट्रोल पंपाची रोकड गोळा करुन रामोशी गेट येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये भरण्यासाठी चालले होते. दरम्यान, बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर लाईट हाऊस इमारतीपाशी त्यांची कार आली. तेव्हा एका दुचाकीस्वाराने कारला दुचाकी आडवी लावली. कार थांबल्यावर दुचाकीवरील उतरलेल्या व्यक्तीने पंप व्यवस्थापक अजय यांना दमदाटी केली. यामुळे अजय कारची काच वर घेत असताना त्याच्या हातावर उलट्या कोयत्याने मारहाण करण्यात आली. यामुळे त्याने कारचा दरवाजा उघडला. ही संधी साधून त्यांच्या पायाजवळ असलेली बॅग घेऊन चोरटा त्याच्या साथीदारासह दुचाकीवरून पळाला. मात्र, त्याची दुचाकी कारला आडवी ठेवण्यात आली. अवघ्या एकाच मिनीटाच ही थरारक घटना घडली. यामुळे नक्की काय झाले, हे आजूबाजूच्या वाहनचालकांनाही समजले नाही. चोरट्यांनी दुचाकीवरुन कोंढव्याच्या दिशेने पळ काढला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)