पुणे : पुढील आणखी तीन दिवसही उकाड्याचे

पुणे- पुणे शहरातील तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर सोमवारपासून अचानक तापमान बदल झाला आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. दुपारी आणि सायंकाळी उकाडा वाढल्याचे चित्र आहे.

गुरूवारी पुणे शहराचे तापमान हे 35 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्तच आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात येत्या चोवीस तासात हवामान कोरडे राहील. तसेच आकाश निरभ्र राहील. राज्यात मात्र काही ठिकाणी अजूनही पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्याच्या काही भागाचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)