पुणे पीपल्स बॅंकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा तळेगाव येथे उत्साहात झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुक्‍यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होता. डोळसनाथ महाराज उत्सव समिती व तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती आखाड्यात स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पीडीसी बॅंकेचे माजी अध्यक्ष माउली दाभाडे, नगरसेवक किशोर भेगडे, पीडीसीसी बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, तळेगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे, पुणे पीपल्स बॅंकेचे संचालक सुभाष मोहिते, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, डोळसनाथ पत संस्थेचे चेअरमन शरद भोंगाडे, नगर सदस्य अरुण माने, मंगलताई भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, नगरसवेक संतोष भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे रघुवीर शेलार, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे,

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, आत्माराम कलाटे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, माजी नगरसेवक अशोक भेगडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कोतुळकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मुऱ्हे, रामभाऊ गवारे, सुदर्शन खांडगे, सचिन भेगडे, चेतन भेगडे, सतीश भेगडे, रवींद्र आप्पा भेगडे, नगरसेवक अमोल शेटे, उर्मिला भेगडे, संभाजी आप्पा भेगडे, सुरेशभाऊ चौधरी, शिवनाथ भेगडे, आनंद भेगडे, राहुल पारगे, पंढरीनाथ ढोरे, दीपक हुलावळे, सुरेश धोत्रे, कृष्णा दाभोळे, शंकर भेगडे, सुनील दाभाडे, सचिन घोटकुले, नारायण ठाकर, ब्रिजेंद्र किल्लावाला, कैलास गायकवाड, चंद्रकांत दहिभाते, स्वानंद आगाशे (सीए), दत्तात्रय पडवळ, विनोद मालू, अशोकशेठ घारे, मंगेशकाका ढोरे, सुभाष जाधव, उत्तमशेठ ओसवाले, अशोक म्हाळसकर यांनी शुभेच्छा दिल्या. पुणे पीपल्स बॅंकेचे सर्व संचालक व पदाधिकारी, डोळसनाथ पत संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी, इंटक कामगार युनियन इंडुरन्स कंपनीचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी, तरुण ऐक्‍य मित्र मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)