पुणे – पीएमपी बस आगीच्या भक्ष्यस्थानी

पुणे – प्रवासी घेऊन निगडीवरून कात्रजच्या दिशेने निघालेल्या पीएमपी बसने मार्गावर अचानक पेट घेतला. यात बस पुर्णपणे जळून खाक झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना तातडीने खाली उतरविल्याने होणारी दुर्घटना टळली. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वारजे परिसरातील आरएमडी शाळेसमोर ही घटना घडली.

निगडीवरुन प्रवासी घेऊन mh 12 kq 1186 ही बस कात्रजच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. वारजे परिसरातील आरएमडी शाळेसमोर बस पोहचल्यावर बसच्या इंजिनमधून धूर बाहेर येण्यास सुरवात झाली. चालकाच्या हे लक्षात आल्याने गाडी थांबवून पाहीले असता धूराचे प्रमाण जास्त दिसले. यामुळे चालकाने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून दिले. स्वतः चालक, वाहकही तेथून लांब आले. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, धुराचे प्रमाण जास्त होऊन बसने पेट घेण्यास सुरवात केली. काही वेळातच बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र आगीचे प्रमाण जास्त असल्याने आगीमध्ये बस जळाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. आग आटोक्‍यात आणण्यासाठी सिंहगड रोड फायर स्टेशनसह कोथरुड फायर विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

…21 बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी
पीएमपीला मार्गावर आग लागण्याच्या घटनात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंत तब्बल 21 बसेसना विविध कारणांनी आग लागल्याची नोंद पीएमपी प्रशासनाकडे आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून उपाययोजनाही करण्यात येत आहेत. असे असले तरी आगींसारख्या घटनांमुळे सर्वसामान्य प्रवाशाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)