पुणे –  पीएमपी तिकीट दरवाढीसाठी मुंबई, ठाण्याचा अभ्यास

PMPML, Pune

पीएमपी प्रशासन : वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू

पुणे – डिझेल आणि सीएनजी दरवाढीचा मोठा फटका पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) बसत आहे. यामुळे पीएमपीचे कंबरडे मोडले असून पीएमपीच्या तिकीट दरवाढीसाठी हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि बंगळुरू या महापालिका हद्दीतील बस तिकिटांचा विचार करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंधन दरवाढ आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा आर्थिक तोटा यामुळे तिकीट दरवाढीचा निर्णय घेण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत डिझेल दरवाढ 8 रुपये तर सीएनजी दरात 3 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीएल महामंडळाला दररोज 3 लाख 60 हजारांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी ही तिकीट दरवाढ निश्‍चित आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 33 बसेस आहेत. त्यापैकी जवळपास 1 हजार 200 बसेस या सीएनजीवर धावतात. यासाठी दररोज 65 हजार किलो सीएनजीची गरज आहे. पण, आता त्याचेही दर वाढल्याने 2 लाख रुपयांचा वाढीव ताण पडत आहे. त्यामुळे ही भाडेवाढ अटळ मानली जात आहे.
—————

गेल्या काही महिन्यांपासून इंधनदरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे पीएमपीएमएलवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. त्यासाठी तिकीट दरवाढीसंदर्भात नियोजन सुरू आहे. यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि बंगळुरू येथील तिकीट दरांचा विचार करण्यात येत आहे. यानुसार येत्या काळात तिकीट दरवाढ विचाराधीन आहे.
– नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)