पुणे – पीएमपी गाड्यांची पावसाळ्यापुर्वी तपासणी

-पुढील आठवड्यापासून देखभाल दुरुस्तीचे काम

पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) गाड्यांची डागडुजी सुरू करण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यातील काही गाड्यांचे आयुर्मान संपून देखील त्या रस्त्यावर धावत आहेत. अशा गाड्यांची पावसाळ्याच्या तोंडावर तपासणी करण्यात येत असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पीएमपी शहरातील वाहतुकीचा मुख्य कणा आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पीएमपीकडील बसची संख्या कमी आहे. पीएमपीच्या मालकीच्या एकून 1,333 बस आहेत. यातील जवळपास 200 पेक्षा जास्त बसचे आयुर्मान 12 वर्षांपेक्षा जास्त आहे. नियमानुसार आयुर्मान संपलेल्या गाड्या या वाहतुकीसाठी धोकादायक असून त्या भंगारात काढाव्या लागतात. मात्र, गाड्यांची संख्या अगोदरच कमी असल्याने या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. पावसाळा लागला की गाड्या बंद पडण्याचे प्रमाणात वाढ होते. पावसाळ्याच्या तोंडावर गाड्या बंद पडणे, पाणी गळणे, तुटलेल्या खिडक्‍या, काचांमधून आत पाणी येणे अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर पीएमपीची देखभाल दुरुस्ती सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गाड्यांची तपासणी करून डागडूजी करण्यात येत आहे. बऱ्याच गाड्यांना पुढील काचेवर वायपर नाही, यामुळे वायपरची खरेदी प्रक्रिया सुरू असून पुढच्या आठवड्यापासून ते काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उचकटलेले पत्रे, तुटक्‍या खिडक्‍या, दरवाजे आदींची दुरुस्ती करण्यात येत आहे. जून महिन्यात पीएमपी प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. या कालावधीत सुरू होणाऱ्या लहान मुलांच्या शाळा, महाविद्यालये यामुळे प्रवासी संख्येत लक्षणीय भर पडून एकूणच यामुळे पीएमपीचे उत्पन्न देखील वाढते.
———-

पावसाळ्यात प्रवासी संख्या, उत्पन्नात वाढ
पीएमपीने प्रवास करणाऱ्यांचा संख्येत पावसाळ्यात लक्षणीय वाढ होते. इतरवेळी शहरात दुचाकीने प्रवास करणारे नागरिक पावसामुळे पीएमपीने प्रवास करणे पसंत करतात. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला यांची संख्येत यादिवसात भर पडतो. यामुळे एकूणच इतर मोसमांच्या तुलनेत पावसाळ्याच्या काळात नागरिकांकडून पीएमपीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तुलनेने पीएमपीचे उत्पन्न ही या कालावधीत वाढते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)