पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांनाही पालिकेप्रमाणे आरोग्य सुविधा

प्रशासनाचा स्थायी समितीमोर प्रस्ताव


मंजुरीची शक्‍यता

पुणे – पीएमपीएलचे कर्मचारी, सेवानिवृत्त आणि स्वेच्छा निवृत सेवकांना अंशदायी वैघकीय सहाय्य योजनेअतंर्गत पालिकेने वैघकीय सेवा पुरवावी, त्यासाठी निधी पीएमपीएमएलने पालिकेला द्यावा, असा प्रस्ताव पालिक प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे.

पीएमपी कर्मचाऱ्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे मागील वर्षीपासून ही सेवा दिली जाते. मात्र, त्यासाठी दरवर्षी स्वतंत्र मान्यता घ्यावी लागत असल्याने पीएमपीच्या मागणीनुसार, प्रशासनाकडून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

पीएमपीएल प्रशासनाने 2018 -19 या आर्थिक वर्षात कर्मचारी, सेवानिवृत्त आणि स्वेच्छा निवृत सेवकांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअतंर्गत पालिकेने वैद्यकीय सेवा द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी पीएमपीएलने वर्षाला 6 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानेही ही सेवा देण्यास हरकत नसल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समिती समोर हा प्रस्ताव ठेवला आहे.

पीएमपीएलकडील निवृत्त सेवकापैकी ज्या सेवकांना पेन्शन लागू आहे, त्या सेवानिवृत्त सेवकांना पालिकेच्या धर्तीवर अशंदायी वैद्यकीय सहाय्य योजना लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय उपचाराची 90 टक्के रक्कम पीएमपी देणार असून 10 टक्के रक्कम कर्मचाऱ्यास भरावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)