पुणे – पीएमपीच्या ‘भंगार’ 103 बसेसचा अखेर लिलाव

पुणे – पीएमपी ताफ्यातील “स्क्रॅप’ करण्यात आलेल्या तब्बल 103 बसचा पीएमपी प्रशासनाने लिलाव केला आहे. यातील अनेक बसेसचे चांगल्या स्थितीतील इंजिनसह इतर पार्टस काढून घेत इतर सांगाड्याचा लिलाव करण्यात आला. या माध्यमातून पीएमपीला सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे 1,500 बस आहेत. यातील बहुतांश बसेस या आयुर्मान संपलेल्या असून मार्गावर चालवणे शक्‍य नाही. परिणामी, अशा बसेस “स्क्रॅप’ करण्यात येतात. संचालक मंडळाने बसचे आयुष्य निश्‍चित केले आहे. त्यानुसार 12 वर्ष पूर्ण किंवा 8 लाख 40 हजार किलोमीटर धाव पूर्ण झाल्यानंतर या बसचे आयुष्य संपते. मात्र, ताफ्यातील अपुऱ्या बसेसमुळे आयुर्मान संपलेल्या बसही मार्गावर सोडल्या जातात. त्यामुळे दर महिन्याला बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडणे तसेच ब्रेकडाऊनसारख्या समस्यांत वाढ झाल्याची दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर भंगार बसेसचा मोडित काढून त्याचा लिलाव करण्यात येतो. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही प्रक्रिया पार पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भंगार बसेसला चांगली किंमत
या लिलावात 20 पेक्षा जास्त बसेसना सुमारे 2 ते सव्वादोन लाख रुपये किंमत मिळाली आहे. तर इतर बस सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त किंमतीत गेल्या. आतापर्यंतच्या लिलावातील ही सर्वाधिक किंमत मिळाली. या लिलावातून सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा महसूल मिळाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)