पुणे – पीएमपीचे ब्रेक फेल : मोठा अनर्थ टळला

File Photo

दोघे निलंबित : आगार अभियंत्यालाही नोटीस

पुणे – नऱ्हे-आंबेगाव येथून शनिवारवाड्याच्या दिशेने येणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाले. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला. यावेळी बसच्या देखभाल दुरुस्तीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी स्वारगेट डेपोतील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आली आहे. दोघेही प्राथमिक चौकशीत दोषी आढळून आल्याने ही कारवाई केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात नऱ्हे येथून सकाळी 8 वाजताच्या सुमारास शनिवारवाड्याच्या दिशेने पीएमपी निघाली होती. सकाळची वेळ असल्याने कामाला तसेच कॉलेजला जाणारे प्रवासी बसमधून प्रवास करत होते. मात्र, नऱ्हे येथून पुढे काही अंतर गेल्यानंतर लगेचच सेल्फी पॉईंट परिसरात बसचे ब्रेक निकामी झाले. चालकाच्या वेळीच हे लक्षात आल्याने त्याने शेजारील मातीच्या ढिगाऱ्यावर गाडी घातल्याने होणारी दुर्घटना टळली. सदर बस ही स्वारगेट डेपोतील आहे. या प्रकरणी आता डेपोतील देखभाल दुरुस्ती विभागात कामास असलेल्या दोघा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, संबंधित डेपोच्या आगार अभियंत्याला नोटीस पाठवली असून तुमच्यावर कारवाई का करू नये? असा सवाल विचारण्यात आला आहे. याप्रकरणी आगार अभियंत्याला त्यांचे म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुन्या बसेसमुळे कर्मचाऱ्यांनाही ताण
ताफ्यातील जुन्या बसेसची संख्या मोठी आहे. अनेक बसेस 12 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या असल्याने त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. परिणामी, त्यांची देखभाल-दुरुस्ती करुनही अनेक बसेस “ब्रेकडाऊन’ होत असल्याचे कर्मचारी सांगतात. तसेच, अशा प्रकारच्या घटनेत निलंबन होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)