पुणे -पीएमपीची वस्तू खरेदीसाठी “गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस’ला पसंती

– झाडूपासून मोटारवाहनापर्यंत सर्व वस्तू विक्रीकरीता उपलब्ध

पुणे – शासकीय कार्यालयांनी त्यांना लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केंद्र शासनाने तयार केलेल्या गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस (जेम) या संकेतस्थळावरुन खरेदी कराव्या, अशा सूचना केंद्र शासनाने सरकारी कार्यालयाला दिल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत तसेच व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) कार्यालयाला लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जेम या केंद्र शासनाच्या संकेतस्थळाला पसंती दिली आहे. याअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात काही वस्तूंची खरेदीदेखील करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारने विविध मंत्रालय व एनजीओच्या माध्यमातून वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी जेम ऑनलाईन बाजारला सुरुवात केली. परिपत्रक काढून सरकारी कार्यालयाने याठिकाणावरुन खरेदी करावी अशा सूचना दिल्या. या ई-मार्केट प्लेसवर अगदी झाडूपासून ते मोटारवाहनापर्यंत सर्व वस्तू विक्री करीता उपलब्ध आहेत. तसेच बाहेरील किंमतीपेक्षा त्या 10 ते 20 टक्‍क्‍याने स्वस्त आहेत. 4 हजार पेक्षा जास्त वस्तूंची विक्री जेमच्या माध्यमातून करण्यात येते. तसेच घरपोच वस्तू मिळत असल्याने तोसुद्धा खर्च वाचणार आहे. यामुळे सरकारी कार्यालयेही जेमला पसंती देत असल्याचे चित्र आहे.
अनेक वेळा वस्तू खरेदीत गैरप्रकार झाल्याचे समोर येते. याला आळा बसवा तसेच सर्व व्यवहार पादर्शकपणे व्हायला हवे, यासाठी ही सूचना पीएमपीच्या भांडार विभागाला देण्यात आली आहे. यानुसार संकेतस्थळावरून वस्तूंची खरेदी करण्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्पात कार्यालयात लागणाऱ्या रजिस्टर, झाडू आदी या संकेत स्थळावरून घेण्यात आले आहेत.
पुढील काळात या संकेतस्थळावरून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

————–

कोट
केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस या संकेतस्थळावरून पीएमपीने वस्तू खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. याबाबत केंद्र शासनाकडून परित्रपक काढण्यात आले आहे. ही सर्व पद्धत्त पादर्शक असल्याने याचा फायदा पीएमपीला होणार आहे. या संकेस्थळावर झाडूपासून ते मोटारवाहनापर्यंत सर्व उपलब्ध आहे.
-नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)