पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक

पुणे: बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला दरोडा प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.
भगवान जालिंदर नैएकर (30, रा. उरावडे, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नैएकर याच्याकडे पिस्तूल असून तो पर्वती येथील निलायम पुलावर येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस नाईक शैलेश सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार नैएकर याला पकडण्यात आले. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतूसे सापडली.

गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे दरोडा प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक फौजदार संजय दळवी, निलेश पाटील, महेश कदम, रामदास गोणते, शैलेश सुर्वे, सचिन गायकवाड, मल्लिकार्जुन स्वामी, विल्सन डिसोजा, प्रविण जाधव, धनाजी पाटील यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)