पुणे : पासधारकांची अपूर्ण माहिती पीएमपीला अंगलट

मागितलेल्या 31 कोटींपैकी मिळणार 27 कोटी रुपये


अर्धवट माहिती दिल्याने पालिकस प्रशासन संभ्रमात

पुणे- नागरिकांना सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या बस पासच्या रकमेपोटी पीएमपीने महापालिकेकडे सुमारे 31 कोटी 14 रुपयांची मागणी केली आहे. मात्र, पीएमपी प्रशासनाने पासधारकांची अर्धवटच माहिती दिल्याने अपूर्ण माहितीच्या पासची रक्कम वगळण्यात आली आहे. पीएमपीला 27 कोटी 34 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. मंगळवारी याबाबत निर्णय होणार आहे.

महापालिकेकडून शहरातील पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागारिक, महापालिका कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, माध्यमिक विभागाचे विद्यार्थी, पालिका शाळांमधील विद्यार्थी, राष्ट्रीय पुरस्काप्राप्त नागरिकांना पीएमपी पास दिले जातात. या पासची काही रक्कम महापालिकेकडून पीएमपीला दिली जाते. त्यानुसार, पीएमपीकडून 3016-17 या आर्थिक वर्षात वितरीत करण्यात आलेल्या सवलतीच्या पासपोटी महापालिकेकडे सुमारे 31 कोटी 14 लाख 10 हजार 579 रूपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी करताना, पीएमपीकडून पास घेतलेल्या नागरिकांची सविस्तवर माहिती देण्यात न आल्याने पालिकेने आपल्या विभागांमार्फत लाभार्थीची यादी तपासणी करून या मागणीपैकी 27 कोटी 37 लाख 30 हजार 405 रूपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर केला आहे.

माहिती न दिल्याने 4 कोटींना कात्री
ही सवलतीच्या पासधारकांची माहिती देताना, पीएमपीने पासधारकांच्या नावांची यादी महापालिकेस सादर करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार, आपल्याकडे असलेली माहिती आणि पीएमपीने पाठविलेली माहिती तपासून त्यानुसार महापालिका हा निधी देते. प्रामुख्याने शिक्षण विभाग, समाज विकास आणि सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सवलतीच्या पासचे लाभार्थी आहेत. त्यानुसार, मुख्यलेखापाल विभागाकडून पीएमपीची माहिती या विभागांना पाठवून त्यांच्याकडून रक्कम निश्‍चित करून घेतली जाते. पीएमपीने 2016-17 साठी सादर केलेल्या यादीत स्वातंत्र्य सैनिक मोफत पास, प्रसार माध्यमे पास, ज्येष्ठ नागरिक सवलत पास यांची माहिती अर्धवट पाठविली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)