पुणे – पालिकेतील हिरकणी कक्षाला टाळे

कक्षाच्या गैरवापराच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन

पुणे – महापालिकेतील महिला कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांसाठी पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे. मात्र, या कक्षाचा वापर इतर कामांसाठी होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कक्षाला मंगळवारी टाळे ठोकण्यात आले. तसेच हा कक्ष तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणी अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेत दोन वर्षांपूर्वी समाज विकास विभागाच्या कार्यालयाच्या एका खोलीत हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. पण, याचा वापर होत नसल्याचे कारण पुढे करत गेल्या काही दिवसांपासून हा कक्ष इतर कामांसाठी वापरला जात आहे. त्यामुळे ही बाब चुकीची असल्याने मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांसह इतर वर्दळीच्या कार्यालयांतही ही सुविधा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मनसेच्या महिला शहराध्यक्ष अॅड. रूपाली पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात वंदना साळवी, ज्योती कोंडे, लावण्या शिंदे, नीता पालवे, सुरेखा होले, अर्चना नांगरे, मनीषा कावेडिया, अनुराधा घुगे, मनिषा सरोदे यावेळी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)